11 December 2019

News Flash

Video : पॉर्न स्टार मिया खलिफाने सांगितली स्वतःची कमाई, चाहते म्हणाले खोटं बोलतेय

सनी लिओनीनंतर जर कोणी सर्वाधिक चर्चेत राहिलं असेल तर ती म्हणजे पॉर्न स्टार मिया खलिफा

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सनी लिओनीनंतर जर कोणी सर्वाधिक चर्चेत राहिलं असेल तर ती म्हणजे पॉर्न स्टार मिया खलिफा. सोशल मीडियापासून ते प्रत्येक व्यक्तींमधील कायम चर्चेचा विषय ठरणाऱ्या मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्रीपासून फारकत घेतली आणि आता ती सामान्य जीवन जगत आहे. मात्र असं असलं तरी तिच्यावरील पॉर्न स्टार हा टॅग अजूनही गेलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ची आजही चर्चेत असते. त्यातच पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पॉर्नस्टारला बक्कळ पैसा मिळतो असा काहींचा समज असतो. मात्र हा समज मियाने दूर केला आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये मियाने तिच्या पॉर्न इंडस्ट्रीच्या काळात किती पैसे कमावले हे सांगितलं आहे. मात्र मियाने तिची एकूण कमाई सांगितल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करत ती खोट बोलत असल्याचं म्हटलं आहे.

अनेकांचा समज आहे की मी पॉर्न स्टार असताना लाखो रुपयांची कमाई केली आहे. मात्र हे पूर्णत: चुकीचं आहे. या विश्वात मी केवळ १२ हजार डॉलर म्हणजे ८ लाख ५२ हजार ६०६ रुपये कमावले आहे. या पैशांव्यतिरिक्त मला एकही रुपया एक्स्ट्रा मिळाला नाही. इतकंच नाही तर मला ही इंडस्ट्री सोडल्यानंतर सामान्य नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागला. तो काळ प्रचंड भितीदायक होता, असं मिया म्हणाली.

वाचा : ‘या’बाबतीत सनीची आघाडी, तर पंतप्रधान मोदींची पिछाडी

मियाने तिच्या कमाईविषयी सांगितल्यानंतर अनेकांनी तिला खोटं ठरवलं. मात्र नेटकऱ्यांनी टीका केल्यानंतर मियाने पुन्हा एक ट्विट करत आपलं मत ठामपणे मांडलं आहे. दरम्यान, मियाने २०१४ साली पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिची लोकप्रियता कमालीची वाढली होती. इंटरनेटवर मियाला सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलं होतं.

 

First Published on August 14, 2019 12:27 pm

Web Title: mia khalifa reveals about the income she got while working as adult film star ssj 93
Just Now!
X