मायकेल जॅक्सनने ‘बिली जीन’ गाण्यात वापरलेले ग्लोव्हज आणि एलव्हीस प्रिसलेच्या निळ्या शूजचा लिलाव लॉस ऐंजिलिस येथे  या आठवड्याच्या अखेरीस होणार आहे. ब्रेव्हरली हिल्स येथील ‘ज्युलिएन ऑक्शन’चे आधिकारी मायकेल जॅक्सनने ‘बिली जीन’ गाण्याच्या वेळी घातलेले ग्लोव्हज आणि त्याच्या ‘स्वरॉव्हस्की’ जॅकेटचा लिलाव करणार असल्याचे वृत्त ‘कॉन्टॅक्टम्युझिक’ने प्रसिध्द केले आहे. मायकेल जॅक्सनच्या या जॅकेटला ३ लाख युएस डॉसर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे १९८६ सालच्या ग्रॅमी अॅवॉर्डमध्ये व्हिटने ह्युस्टनने घातलेला ड्रेसचा देखील या ठिकाणी लिलाव होणार असून, त्याला ५ हजार युएस डॉलर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतर वस्तूंमध्ये अमेरिकन पियानो वादक लिबरेसचा सोने आणि चांदिच्या धाग्यांपासून बनवलेला पायजमा आणि त्याच्या लास व्हेगासमधील घरातील झुंबराचा समावेश आहे.