गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध चित्रपटनिर्माते महेश भट्ट यांच्या नावे असलेल्या खोट्या फेसबूक अकाऊंटच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. महेश भट्ट यांनी आपल्या चाहत्यांना याबद्दल वेळोवेळी सावधदेखील केले होते.  मात्र, या अकाऊंटमुळे दिवसेंदिवस वाढणारा उपद्रव बघता भट्ट यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी आलिया भट्टलाही अशाप्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आलियाने आपले कोणतेही फेसबूक अकाऊंट नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. महेश भट्ट यांचेदेखील फेसबूकवर अकाऊंट नसले तरी, ट्विटरच्या माध्यमातून ते सोशल साईटसवर आपली मते मांडताना दिसतात.