News Flash

मिका सिंग करणार ‘या’ अभिनेत्रीशी लग्न, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्रीने सोशल मीडियावर मिका सिंगसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड गायक मिका सिंग अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर आकांक्षा आणि मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन आकांक्षा आणि मिका सिंग लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. पण दोघांनीही या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. आता आकांक्षाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आणि मिका सिंग गुरुद्वारामध्ये असल्याचे दिसत आहे. तेथे त्यांच्यासोबत कुटुंबातील काही व्यक्ती उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आकांक्षाने ‘आशिर्वाद घेत आहोत’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तसेच तिने हा व्हिडीओ मिका सिंगला टॅग करत हार्ट असलेले इमोजी वापरले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Puri (@akanksha8000)

काही दिवसांपूर्वी आकांक्षाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. ‘मला माहित आहे चाहते आम्हा दोघांना एकत्र पाहू इच्छितात. पण असे काही नाही’ असे आकांक्षा म्हणाली होती. सध्या आकांक्षाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

२०१९मध्ये आकांक्षा पुरी ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी पारस छाबडामुळे ती चर्चेत होती. त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शो मधून बाहेर पडताच दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात होते. आता पारसचे नाव माहिरा शर्माशी जोडले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 10:20 am

Web Title: mika singh get married with tv actress akanksha puri avb 95
Next Stories
1 चित्रीकरणस्थळी ‘करोना’दक्षता!
2 “ये क्या हुआ, कैसे हुआ…..”, ‘या’अभिनेत्रीला झाली करोनाची लागण
3 ‘वेल डन बेबी’मधील नवीन गाणं रिलीज
Just Now!
X