बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. दरम्यान प्रसिद्ध गायक सोनू निगमने देखील एक व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडमधील संगीत क्षेत्रातील घराणेशाहीवर निशाणा साधला होता. त्याला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. तर काही कलाकारांनी सोनू निगमवर टीका केली. आता प्रसिद्ध गायक मिका सिंगने देखील सोनू निगमवर निशाणा साधला आहे.

मिका सिंगने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने, ‘या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या कलेचा आदर केला जातो. २००७मध्ये मी मुंबईला आले आणि फिल्ममेकर संजय गुप्ता यांचा चित्रपट शूटआउट अॅट लोखंडवाला या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काम करण्याच्या दृष्टीने ही इंडस्ट्री खूप मस्त आहे आणि आपण इंडस्ट्रीचा आदर करायला हवा. मी इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हे पाहिले आहे की असे अनेक गायक आहेत ज्यांनी कौशल्याच्या जोरावर स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे’ असे म्हटले.

आणखी वाचा : सोनू निगमला उत्तर देण्यासाठी स्वयंपाक्याची घेतली मदत; व्हिडीओ पाहून नेटकरीही गोंधळले

 

View this post on Instagram

 

I think she forgot to open her comments. Let’s help her in that.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

आणखी वाचा : ‘गुस्सा थूक दो वरना शेरू जी के श्राप से…’ दिव्या खोसला यांचे ट्रोलर्सला उत्तर

‘सोनू निगम असे म्हणतोय की नव्या गायकांना गाणे मिळत नाही. पण असे अनेक गायक आहेत ज्यांनी गेल्या काही काळात लोकप्रियता मिळवली आहे. त्यामध्ये अरजीत सिंह, अरमान मलिक आणि बी प्राक अशा अनेक गायकांचा समावेश आहे. या व्यक्तीरिक्त आमच्या पंजाबी इंडस्ट्रीमधील अनेक शानदार टॅलेंट समोर आले. आता बी प्राक इंडस्ट्रीमधील कोणाचा मुलगा तर नाही. अनेक लोक काम करत आहेत आणि भूषण कुमारने त्यांना ब्रेक दिला आहे. काही म्यूझिक लेबल असे आहेत जे तुम्हाला केवळ ब्रेक देतात. त्यानंतर तुम्ही आणि त्यानंतर तुमच्या गाण्याचे काय होते हे याचे त्या म्यूझिक लेबल्सला काही पडलेले नसते’ असे मिका पुढे म्हणाला.