News Flash

मिक्का सिंगचा कंगनावर निशाणा, ‘बेटा कंगना, तू करण आणि हृतिक……’

मिक्का सिंगचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनावरुन कंगना आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु होते. दरम्यान मिक्का सिंगने ट्विट करत कंगनावर निशाणा साधला आहे.

मिक्काने नुकताच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने कंगनाला सुनावले आहे. “आपल्या सर्वांचा हेतू शेतकऱ्यांना समर्थन करण्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी तेथे लक्ष केंद्रीत करा. ती वेडी आहे, त्यामुळे तिला तिचे आयुष्य जगू द्या. बेटा कंगना तू करण जोहर, रणवीर सिंह, हृतिक रोशन आणि बॉलिवूडमधील इतर कलाकरांना ‘सॉफ्ट टारगेट’ करतेस. पण माझ्या बाबतीत असे होणार नाही” या आशयाचे ट्विट त्याने केले होते.

दरम्यान, मिक्का सिंगने केले आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का? असा सवाल त्याने कंगनाला केला होता. “आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणे सोपे आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही” अशा आशयाचे ट्विट करुन मिक्काने कंगनावर निशाणा साधला होता.

शेतकरी आंदोलनात ८७ वर्षांच्या महिंदर कौर सहभागी झाल्या होत्या. त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. कंगनाने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. तिला या ट्विटमुळे ट्रेल केले जात होते. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 11:31 am

Web Title: mika singh slams kangana ranaut says she target soft people like karan johar and ranveer singh avb 95
Next Stories
1 बिग बॉस १४मध्ये दोन नव्या स्पर्धकांची एण्ट्री
2 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलजीतनं एक कोटींची केली मदत, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आभिमान
3 चित्ररंजन : अलवार नात्याची गोष्ट
Just Now!
X