News Flash

पाहा: गायक मिका सिंगने डॉक्टरच्या लगावली श्रीमुखात!

गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान एका डॉक्टरला श्रीमुखात लगावल्याने प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे.

| April 13, 2015 03:00 am

गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान एका डॉक्टरला श्रीमुखात लगावल्याने प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे. दिल्लीतील एका डॉक्टरांच्या संघटनेच्या तीन दिवसीय परिषदेनंतर मिका सिंग याच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मिकाने ‘तू मेरा हीरो’, ‘सावन में लग गई आग’, आणि ‘जुम्मे की रात’ ही गाणी सादर केली. यादरम्यान, मिकाने दिल्लीतील लोकांची, डॉक्टर्सची तोंडभरून स्तुतीही केली. मात्र, गाण्यांचा हा कार्यक्रम रंगत गेला तशी व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे मिकाने पुरूषांना व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना तर महिलांना व्यासपीठाच्या मध्यभागी राहून नाचायची विनंती केली.
कार्यक्रमाच्या शेवटी जवळपास सर्व डॉक्टर्स जेवण्याच्या स्टॉलवर गेले होते. तेव्हा अचानकपणे संगीत वाजायचे बंद झाले आणि मिकाने त्याच्या बाऊन्सर्सना प्रेक्षकांमधील एका डॉक्टरला पकडून आणायला सांगितले. या डॉक्टरला स्टेजवर आणल्यानंतर मिकाने सर्वांदेखत त्याच्या श्रीमुखात लगावली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे थोड्यावेळासाठी सगळे जण अचंब्यात पडले. मात्र, संबंधित डॉक्टर महिलांमध्ये नाचत होता आणि अश्लील हावभाव करत होता, त्यामुळे आपण त्याला मारल्याचे मिकाचे म्हणणे आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर्स आणि मिका सिंग यांच्यात चांगलीच जुंपली होती. अखेर पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी याप्रकरणी पोलीसांत मिका सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2015 3:00 am

Web Title: mika singh slaps doctor at an event in delhi
टॅग : Bollywood
Next Stories
1 मराठी चित्रपटांना प्राईम टाईम द्यायचा की नाही, हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच ठरवू दे- अनुपम खेर
2 कोर्टबाजी!
3 फिल्म रिव्ह्यू : हास्यास्पद करमणूक
Just Now!
X