28 October 2020

News Flash

मिलिंद सोमण -अंकिता दिसणार ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात?

सोशल मीडियावरची ही बहुचर्चित जोडी लवकरच 'बिग बॉस'च्या नव्या पर्वात दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिलिंद सोमण आणि अंकिता

मिलिंद आणि अंकिता सोमण हे सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकले. अंकिता मिलिंदपेक्षा २५ वर्षांनी लहान असल्यानं त्यांचं लग्न अधिक चर्चेत होतं. आता सोशल मीडियावरची ही बहुचर्चित जोडी लवकरच ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हिंदी ‘बिस बॉस’च्या १२ व्या पर्वासाठी मिलिंद-अंकिता या विवाहित जोडप्याला विचारण्यात आलं आहे. ‘कलर्स’ वाहिनीनं हिंदी ‘बिग बॉस’साठी दोघांशी संपर्क साधल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र अद्यापही या दोघांनी हिंदी ‘बिग बॉस’साठी होकार कळवला नसल्याचंही समजत आहे. ‘बिग बॉस’च्या काही स्पर्धकांच्या नावांबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. लवकरच सर्व स्पर्धकांची नावं निश्चित करण्यात येणार आहे. यावेळीचं ‘बिग बॉस’ हे ‘जोडी’ या संकल्पनेवर आधारलेलं असणार आहे. त्यामुळे आई-मुलगा, वडील- मुलगी, भावंडं, नवरा -बायको किंवा गर्ल फ्रेंड- बॉयफ्रेंड अशा जोड्या ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात पाहायला मिळणार आहे.

या व्यतिरिक्त कॉमेडिअन सिद्धार्थ सागर आणि त्यांची गर्लफ्रेंड शुभी जोशी, पॉर्नस्टार डॅनी डी ही नावंदेखील चर्चेत आहेत. डॅनीनं ‘बिग बॉस’मध्ये येण्यास होकारही दर्शवला आहे. इतकंच नाही तर माहिका शर्मा आपली काळजी घेणार असेल तर ‘बिग बॉस’मध्ये येण्यास माझी काही हरकत नाही असंही डॅनी म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 11:57 am

Web Title: milind and ankita soman might be a part of bigg boss 12
Next Stories
1 आलियाच्या आईसोबतही नीतू सिंगचे जुळले सूत
2 जान्हवी म्हणते, माझी साराशी स्पर्धा नाहीच!
3 बिग बींची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात, बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप
Just Now!
X