06 August 2020

News Flash

Video : तरुणांनाही लाजवेल असा उत्साह; मिलिंद सोमणच्या आईने असा साजरा केला वाढदिवस

८१ वर्षांच्या उषा सोमण नेटकऱ्यांसाठी नवीन आदर्श ठरतायत.

कधी सुनेसोबत लंगडी खेळत, कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या मारत अभिनेता मिलिंद सोमणच्या आईने नेटकऱ्यांना नेहमीच आश्चर्यचकीत केलंय. ८१ वर्षीय उषा सोमण यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. मात्र या सेलिब्रेशनमधूनही त्यांनी नेटकऱ्यांना फिटनेसचा संदेश दिला आहे. मिलिंद सोमणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ व फोटो पोस्ट केला आहे. या व्हिडीओत उषा सोमण पुशअप्स करताना दिसत आहेत.

‘३ जुलै २०२०. लॉकडाउनमध्ये वाढदिवस साजरा केला. १५ पुशअप्स आणि अंकिताने बनवलेल्या केकसोबत पार्टी केली. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओत उषा सोमण पुशअप्स करताना दिसत आहेत.

वर्कआऊट करणं आणि त्यात सातत्य ठेवणं सहजसोपं नसतं. तेसुद्धा वयाच्या ८१ व्या वर्षी. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. त्या कधी सुनेसोबत लंगडी खेळताना दिसतात तर कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या मारताना दिसतात. उषा सोमण या नेटकऱ्यांसाठी नवीन आदर्श ठरतायत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 2:13 pm

Web Title: milind soman 81 years old mother celebrated her birthday in a unique way ssv 92
Next Stories
1 ‘शाहिद खरा चॉकलेट बॉय नाही’; मीरा राजपूतचं अजब वक्तव्य
2 ‘सर्किट’लाही वाढीव वीजबिलाचा शॉक! निवडला ‘हा’ मार्ग
3 बिग बींनी सांगितली ‘प्रतीक्षा’ बंगल्यातल्या ४३ वर्षे जुन्या गुलमोहर झाडाची गोष्ट
Just Now!
X