सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला अभिनेता मिलिंद सोमणचा विवाह सोहळा अखेर पार पडला. ५२ वर्षीय मिलिंद सोमणने आपली २७ वर्षीय प्रेयसी अंकिता कोनवारशी अलिबागमध्ये विवाहबद्ध झाला. या विवाह सोहळ्यात मिलिंद आणि अंकिताचे जवळचे नातेवाईक आणि मित्र- मंडळी उपस्थित होते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच मिलिंद आणि अंकिता यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी अंकिताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत नात्यात कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्ट केले होते.

लग्नाच्या रेशीम गाठीत बांधले गेल्यानंतर मिलिंदने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, ‘येणारा प्रत्येक दिवस हा नात्याची नवीन सुरुवात करेल’, असे मिलिंदने म्हटले. या फोटोमध्ये नवविवाहित दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद झळाळत आहे. अंकितानेही आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत ‘अखेर खऱ्या प्रेमाला त्याचा मार्ग सापडतोच’, असे अनोखे कॅप्शन दिले आहे.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

वाचा : ड्वेन जॉनसनच्या घरी चिमुकलीचे आगमन!
मिलिंद आणि अंकिता यांच्या नात्यामध्ये वयाचे अंतर जास्त असल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता. मात्र लोकांनी माझ्या आणि अंकिताच्या नात्यावर आक्षेप घेतला तरी मी त्याकडे दुर्लक्ष करतो, असे मिलिंदने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये सांगितले. तसेच प्रेमाला वयाचे अंतर नसते हे मिलिंद आणि अंकिताने सिद्ध केल्याचे दिसून येते. दरम्यान, मिलिंद आणि अंकिता यांच्या लग्नाचे रिसेप्शन विदेशात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.