News Flash

मिलिंद सोमणने शेअर केला तरुणपणीचा फोटो, पत्नी अंकिता म्हणाली..

मिलिंदची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

(Photo credit : Milind Soman Instagram)

देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. मिलिंदचे लाखो चाहते आहेत. मिलिंद बऱ्याच वेळा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. दरम्यान, मिलिंदने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप जूना आहे. मिलिंदने काश्मिरी कपडे परिधान केले आहेत. “थ्रोबॅक टू १९९१ काही जूनी काश्मिरी वस्त्र, काळी स्पॅन्डेक्स, दिल्लीचा तापता सुर्य आणि मी,” अशा आशयाचे कॅप्शन मिलिंदने त्या फोटोला दिले आहे. हा फोटो १९९१ चा असल्याचे मिलिंदने सांगितले आहे. या फोटोतो मिलिंद हॉट दिसतं आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे मिलिंदची पत्नी अंकिताच्या कमेंटने वेधले आहे. या फोटोवर कमेंटकरत अंकिता ‘यम्मी’ असं म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

या आधी मिलिंदने एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत कोणत्याही परिस्थितीत आपण फिट राहू शकतो आणि सोबतच ऐतिहासीक काळात लोक कशा प्रकारे फिट रहायचे याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

दरम्यान, फक्त मिलिंद नाही तर त्याची आणि पत्नी देखील फिट आहेत. मिलिंदची आई ही वृद्ध लोकांसाठी प्रेरणा देणारी एक स्त्री आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 10:14 am

Web Title: milind soman drops an unseen 1991 picture from his modelling days wife ankita konwar calls it yummmm dcp 98
Next Stories
1 सलमानला दिशा म्हणाली ‘स्वीट’; जॅकी श्रॉफ बोलले ‘सुना तू बहुत डेंजरेस है…..!’
2 अर्सलच्या पोस्टवर सुझानच्या कमेंटने वेधले सगळ्यांचे लक्ष
3 नवी नवरी कॉमेडियन सुगंधा मिश्रावर गुन्हा दाखल ; लग्नाच्या व्हायरल व्हिडीओमुळे आली अडचणीत
Just Now!
X