News Flash

मिलिंद सोमणने घरच्या घरीच पिकवल्या फळभाज्या; पाहा टेरेस गार्डनिंगचे फोटो

मिलिंदला वर्कआऊटसोबतच गार्डनिंगमध्येही रमायला आवडत असल्याचं दिसून येत आहे

तरुणाईचा फिटनेस आदर्श म्हणून कायम अभिनेता मिलिंद सोमणची तरुणांमध्ये चर्चा असते. मिलिंद बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊटचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो.त्यामुळे चाहत्यांमध्ये तो कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी तो अन्य एका कारणामुळे चर्चेत आला आहे. मिलिंदने आता वर्कआऊटचा फोटो शेअर करण्याऐवजी चक्क गार्डनिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याला वर्कआऊटसोबतच गार्डनिंगमध्येही रमायला आवडत असल्याचं दिसून येत आहे.

मिलिंदने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने घरच्या घरी काही फळभाज्यांची शेती केली आहे. यात त्याने काकडी आणि शिरोळी हातात घेऊन फोटो शेअर केला आहे.

“अखेर एक लांब दाढी असलेला शेतकरी, अंकिताची इच्छा होती तसाच. स्वत:च्या हाताने उगवलेल्या भाज्या खाण्यात खरंच एक आनंद आहे. लॉकडाउनमध्ये एक लहानसं ग्रीन हाऊस किंवा भाज्यांचं घरं”, असं कॅप्शन मिलिंदने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, मिलिंद सोशल मीडियावर सक्रीय असून अनेक वेळा तो फॅमिलीसोबतचे, वर्कआऊटचे फोटो शेअर करत असतो. त्याच्याप्रमाणेच त्याची पत्नी अंकितादेखील फिटनेस फ्रिक आहे. अलिकडेच तिने मिलिंदचा वर्कआऊट करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यात अंकिताला पाठीवर बसवून मिलिंद पुशअप्स करत होता. हा फोटो सोशल मीडियावर बराच चर्चिला गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 1:48 pm

Web Title: milind soman farming video viral on internet ssj 93
Next Stories
1 १० वर्षांपूर्वी असा दिसायचा सिद्धार्थ चांदेकर; फोटो पाहून व्हाल थक्क
2 ‘बॉलिवूड क्वीन’ हेअरस्टायलिशच्या रुपात; बहिणीचा केला हेअरकट
3 अभिनेत्रीला करोनाची लक्षणं पण चाचणीच कोणी करेना; सरकारकडे केली विनंती
Just Now!
X