22 September 2020

News Flash

‘अंकिता के पापाजी है मिलिंद’ म्हणणाऱ्यांना मिलिंदचे मजेशीर उत्तर

मिलिंदचे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल

मॉडेल, बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मिलिंदने त्याच्या पेक्षा २६ वर्षांनी लहान अंकिता कोनवारशी लग्न केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली होती. पण दोघांनीही या गोष्टीची कधीच फिकिर केली नाही. नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये मिलिंदने नेटकऱ्यांच्या कमेंटला उत्तरही दिले आहे.

मिलिंद आणि अंकिताचा एक प्रमोशनल व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि मिलिंदने त्यांच्यावर करण्यात आलेल्या कमेंट वाचल्या आहेत. दरम्यान एका कमेंटमध्ये अंकिताने मिलिंदला पापाजी आवाज द्यावा असे लिहिले होते. ती कमेंट वाचून मिलिंदच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले आहे. मजेशीर अंदाजात उत्तर देत मिलिंद म्हणतो ‘कधी कधी अंकिता मला पापाजी आवाजही देते.’

‘आमच्या दोघांच्या वयात फार अंतर आहे. जवळजवळ २६ वर्षे. माझी आई आणि माझ्यामध्येही इतकेच अंतर आहे. वय हा केवळ एक आकडा आहे’ असे मिलिंद त्याच्या आणि अंकिताच्या वयाबद्दल पुढे बोलतो.

वाचा : गौरी खानने डिझाइन केला होता शाहरुखचा गाजलेला ‘बाजीगर’ लूक

‘समाजात प्रेमावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. ही बंधने धर्म, वंश, देश, लिंग, वयाचे अंतर या गोष्टींमुळे लादण्यात आली आहेत. पण मला असे वाटते का समाजात अशी बंधने नसावीत. लोकांना प्रेम करण्याची आणि स्वत:चा जोडीदार शोधण्याचे स्वातंत्र असायला हवे असे मला वाटते. लोकांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या भावना आणि मनाचे ऐकून निर्णय घ्यावेत’ असे मिलिंद म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 4:37 pm

Web Title: milind soman gave answer to troller avb 95
Next Stories
1 Photo : वयाच्या ४० व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री करणार दुसऱ्यांदा लग्न
2 गुगल ट्रेण्डमध्येही रानू मंडल यांची लता मंगेशकरांशी स्पर्धा
3 अरे हा तर तैमुरच! अभिनेत्रीचा फोटो पाहून नेटकरी झाले अवाक्
Just Now!
X