29 September 2020

News Flash

अखेर ‘आर्यनमॅन’ अडकला लग्नाच्या बेडीत

किताने सोनेरी काट असलेली पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यालाच साजेसे आसामी पद्धतीचे दागिनेही तिने घातले आहेत

हो नाही म्हणता म्हणता अखेर आर्यनमॅन मिलिंद सोमण लग्नाच्या बेडीत अडकलाच. आज २२ एप्रिलला त्याने अंकिता कोनवारशी मराठी आणि आसामी या दोन्ही पद्धतीने अलिबागमध्ये लग्न केले. अंकिताने सोनेरी काट असलेली पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यालाच साजेसे आसामी पद्धतीचे दागिनेही तिने घातले आहेत. तर पेहरावात मराठमोळा टच असावा म्हणून तिने लावलेली चंद्रकोरही उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती.

मिलिंदने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. दोघांनी यावेळी फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या होत्या. दोघांचा पेहराव जरी आसामी पद्धतीचा असला तरी पारंपरिक मराठी पद्धतीने त्यांचे लग्न लावण्यात आले. यावेळी मिलिंदची आईही फार उत्साहत सुनेचे कौतुक करताना दिसली.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याबद्दल बोलले जात होते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही अलिबागमध्ये आपल्या लग्नाची तयारी करताना दिसत होते. त्यांचे लग्न मंडपाचे आणि लग्नाच्या तयारीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

दोन दिवसांपासून त्यांच्या लग्न समारंभाला सुरूवात झाली. मेहंदी सेरेमनीपासून ते हळदीपर्यंत सगळे कार्यक्रम अगदी धूमधडाक्यात पार पडले. हळदीच्यावेळी अनेकांनी मराठी, आसामी आणि बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला. काल २१ एप्रिलला फोटोग्राफर अंजू केपी नामक व्यक्तिने मेहंदीने भरलेल्या हाताने मिलिंदला पाहतानाचा अंकिताचा फोटो अपलोड केला होता. यानंतर अंकिताचा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला एक फोटो व्हायरल झाला होता.

काहीच दिवसांपूर्वी ५२ वर्षीय मिलिंदने २७ वर्षीय अंकिताशी साखरपुडा केला होता. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने मिलिंदचा हात पकडलेला दिसतो. हातात हात पकडलेला तिच्या फोटोपेक्षा मिलिंदच्या चाहत्यांचे अंकिताच्या अंगठीकडे अधिक लक्ष जाते. तिच्या अंगठीकडेच पाहून दोघांनी साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते.

रिपोर्ट्सनुसार, अंकिता आणि मिलिंदमधील वयाचा फरक लक्षात घेता अंकिताच्या कुटुंबियांकडून या नात्याला विरोध केला जात होता. म्हणून काही दिवसांपूर्वी मिलिंद अंकिताच्या कुटुंबियांना भेटला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर अंकिताच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदील दिला.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. लोकांच्या मतांची फारशी पर्वा न करता तो अनेकदा अंकितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल फारशा सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत नाही. मात्र, तरीही मिलिंद त्यांच्या नात्याबद्दल ठाम आहे. मिलिंदच्या बायकोचे खरे नाव अंकिता नसून संकुस्मिता कोनवार आहे. संकुस्मिता २०१३ पासून एका एअरलाइनमध्ये ‘केबिन क्रू’ म्हणून काम करते आहे. मिलिंदने अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 3:24 pm

Web Title: milind soman marries ankita konwar in traditional ceremony see photos
Next Stories
1 ‘दादासाहेब फाळके एक्सेलन्स’ पुरस्कारांनी सन्मानित झाला ‘हा’ ‘पद्मावत’ स्टार
2 बिग बॉसच्या घरात जेव्हा होते शरद उपाध्येंची एण्ट्री
3 युद्धभूमी सज्ज! ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला
Just Now!
X