News Flash

मिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले…

मिलिंद सोमणच्या शुभेच्छा पाहून मोदी झाले खुश; म्हणाले...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केले. मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. जनमानसता त्यांची एक खास प्रतिमा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अभिनेता मिलिंद सोमण याने देखील आपल्या अनोख्या शैलीत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे मोदींनी देखील शुभेच्छा स्विकारत प्रतिक्रिया दिली आहे.

अवश्य पाहा – “मुलांसाठी थाळ्या सजवतात अन् आम्हाला फेकलेले तुकडे देतात”

“प्रिय, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी व सक्रिय विरोधी पक्षासाठी मी प्रार्थना करतोय. जेणेकरुन आपला महान देश आणखी प्रगती करेल.” अशा आशयाचं ट्विट करुन मिलिंदने मोदींना शुभेच्छा दिल्या. मोदींनी देखील या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. “वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल व महत्वाकांक्षी विचार प्रकट केल्याबद्दल धन्यवाद.” असं ट्विट त्यांनी केलं. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 11:58 am

Web Title: milind soman narendra modi birthday wishes mppg 94
Next Stories
1 “एकदा भेटा मग दाखवतो”; खोट्या मेसेजद्वारे पैसे उकळणाऱ्यांवर सोनू सूद संतापला
2 “एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा”; कंगनाला सल्ला
3 ..म्हणून प्रिया बापटने ‘चक दे इंडिया’ला दिला होता नकार
Just Now!
X