संपूर्ण जगासमोर आज करोना व्हायरसने आव्हान निर्माण केले आहे. भारतात खासकरुन महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा केली. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता मिलिंद सोमण भाजी आणण्यासाठी बऱ्याच दिवसांनंतर घरातून बाहेर पडला. पण बाहेरची परिस्थिती पाहून तो ही आश्चर्यचकित झाला आहे.
मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअऱ त्याने ‘काल बाजारात जाण्यासाठी पहिल्यांदाच घरातून बाहेर पडलो. रस्त्यावर एकही गाडी नाही, लोकांनी मास्क घातले आहेत. सगळीकडे शांतता होती’ असे कॅप्शन दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मिलिंदने क्वारंटाइनमध्ये काय करत आहे याचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो पत्नी अंकिताकडून तेल लावून घेताना दिसत होता. तसेच त्याने डम्बल्स आणि वेट उचलून स्विमिंगपूलमध्ये धावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे क्वारंटाइनमधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मिलिंद नेहमी त्याच्या फिटनेस आणि पत्नीमुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी अंकिता देखील फिटनेस फ्रिक आहे. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाच्या फरकामुळे त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 6:54 pm