‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमणला भारताचा पहिला पुरुष सुपर मॉडल असंही म्हटलं जातं. मिलिंदने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणूनच केली होती आणि त्यात त्याला अपेक्षित यशसुद्धा मिळालं होतं. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेकदा मिलिंदला वादविवादालाही सामोरं जावं लागलं होतं. या वादाचं कारण ठरलं होतं ते म्हणजे गर्लफ्रेंडसोबतचं न्यूड फोटोशूट. मधू सप्रेसोबतचा तो फोटो मिलिंदने पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्या वेळी वादाचं कारण ठरलेला हा फोटो शेअर करत मिलिंदने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या टाइमलाइनवर अधून-मधून या फोटोचं पॉप-अप दिसत असतं. २५ वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. त्यावेळी सोशल मीडिया, इंटरनेट हे काहीच नव्हतं. जर हा फोटो आताच्या घडीला प्रदर्शित झाला असता तर काय झालं असतं याचा विचार करतोय.’

Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

मिलिंद सोमणने १९८८ मध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तो अनेक व्हिडीओ व जाहिरातींमध्ये झळकला. १९९५ मध्ये मिलिंदने गर्लफ्रेंड मधू सप्रेसोबत न्यूड फोटोशूट केलं. या फोटोशूटमुळे मिलिंद व मधू सप्रेवर केवळ टीकाटिप्पणीच झाली नाही तर जाहिरात कंपनीला खटल्याचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मिलिंद व मधू एकमेकांना डेट करत होते. प्रबुद्धा दासगुप्ता यांनी हे फोटोशूट केलं होतं. एका बूटांच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी हा न्यूड फोटोशूट करण्यात आला होता.