News Flash

‘नुसतं वय वाढलं, पण अद्याप…’; मिलिंद सोमणच्या ‘न्यूड फोटो’वर शेखर सुमन यांचा टोला

न्यूड फोटोशूटप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अश्लिल व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मिलिंदचं वय ५५ झालं आहे पण त्याच्या कृती अद्याप लहान मुलांसारख्याच दिसतायेत”, असा उपरोधिक टोला शेखर सुमन यांनी लगावला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

मिलिंद सोमणनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक धावत असतानाचा एक न्यूड फोटो शेअर केला होता. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली.

अवश्य पाहा – ‘आमच्या भावनांशी खेळ नकोस’; दया बेनच्या त्या फोटोंवर चाहते संतापले

 

View this post on Instagram

 

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ४ नोव्हेंबर रोजी आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अश्लिल व्हिडीओचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 6:21 pm

Web Title: milind soman shekhar suman nude photo mppg 94
Next Stories
1 महेश मांजरेकर यांचं दमदार पुनरागमन; केली ड्रीम प्रोजेक्टची सुरुवात
2 अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज
3 Bigg Boss : ‘या’ स्पर्धकाला करावा लागला आर्थिक संकटाचा सामना, म्हणाला…
Just Now!
X