देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. पण काही दिवसांपूर्वी त्याने केलेले न्यूड फोटोशूट चर्चेत होते. त्या फोटोवरुन मिलिंदला आजही ट्रोल केले जाते.
नुकताच मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने हा १ जानेवारी रोजी काढलेला फोटो असल्याचे म्हटले आहे. मिलिंदचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी त्याच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. काहींनी ट्रोल केले आहे. पण मिलिंद देखील शांत बसला नाही. त्याने त्या ट्रोलर्सला भन्नाट उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
एका यूजरने मिलिंदच्या या फोटोवर ‘हेच ते भाऊ जे नागडे धावलेले अशी बातमी होती’ अशी कमेंट केली होती. त्या यूजरला मिलिंदने उत्तर देत ‘जे नागडे धावतात’ असे म्हटले होते. त्याच्यासोबत मिलिंदने हसण्याचा इमोजी देखील वापरला होता.
View this post on Instagram
मिलिंदने त्याचा वाढदिवस साजरा करताना त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो विवस्त्र बीचवर धावताना दिसत होता. त्यानंतर गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात मिलिंद विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 5:29 pm