News Flash

ओळखलत का चिमुकल्याला? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय मॉडेल, अभिनेता

हा अभिनेता फिटनेससाठी विशेष ओळखला जातो.

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून फोटोमधील अभिनेता कोण आहे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हा अभिनेता, मॉडेल दुसरा तिसरा कोणी नसून मिलिंद सोमण आहे. नुकताच मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे. मिलिंदने हा फोटो शेअर करत ‘पावसाळा येण्याआधीची साफसफाई करताना पाहा मला काय सापडेल. १९६७, जेव्हा मी दोन वर्षांचा होतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर मिलिंदचा हा फोटो चर्चेत आहे. अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

याआधी मिलिंदने १९९१ मधील एक जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत “थ्रोबॅक टू १९९१ काही जूनी काश्मिरी वस्त्र, काळी स्पॅन्डेक्स, दिल्लीचा तापता सुर्य आणि मी” अशा आशयाचे कॅप्शन दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

या पोस्टवर मिलिंदची पत्नी अंकिताने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने ‘यम्मी’ असे म्हटले होते. मिलिंद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत त्याचे वर्कआऊट व्हिडीओ, जुने फोटो शेअर करताना दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 5:25 pm

Web Title: milind soman treats fans to his childhood picture from 1967 avb 95
Next Stories
1 सलमानच्या ‘राधे’मध्ये एका माजी सैन्य अधिकाऱ्याने साकारली खलनायकाची भूमिका
2 प्रदर्शित होताच ‘राधे’ चित्रपटाने केला नवा विक्रम
3 “सगळ्या चांगल्या गोष्टी एक दिवस संपतातच”; महेश भट्ट आणि मुकेश भट्ट विभक्त होण्यावर इमरानचं मत
Just Now!
X