News Flash

‘फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय विचार?’ चाहत्याच्या प्रश्नाला अंकिताचे मजेशीर उत्तर

अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.

अंकिता आणि मिलिंदमध्ये २६ वर्षांचे अंतर आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोणवार हे कायम चर्चेत असतात. ते सतत सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो आणि वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकताच अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान एका चाहत्याने तिला फॅमिली प्लॅनिंग विषयी प्रश्न विचारला आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने तिला ‘तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर अंकिताने दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘आम्ही एक प्लॅन फॉमिली आहोत’ असे मजेशील अंदाजात म्हटले आहे.

Milind Soman,Milind Soman wedding,Milind Soman Ankita Konwar,Ankita Konwar,Ankita Konwar age,Ankita Konwar Milind Soman age,

आणखी वाचा : ‘ना साडीची चिंता ना आजू-बाजूच्या लोकांची’, सेल्फीसाठी महिलेचे पूशअप्स

अंकिता आणि मिलिंदने २२ एप्रिल २०१८ रोजी अलिबागमध्ये लग्न केले. त्यांनी केवळ जवळच्या लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर २०१९मध्ये अंकिता आणि मिलिंदने स्पेनमध्ये देखील लग्न केले. अंकिता आणि मिलिंदमध्ये २६ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले. पण अंकिता आणि मिलिंद याकडे फारसे लक्ष देत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:24 pm

Web Title: milind soman wife ankita konwar gives a sassy reply who asked about family planning avb 95
Next Stories
1 ह्रतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानचा नवा लूक; शेअर केला व्हिडीओ
2 सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; बायोपिकचा मार्ग मोकळा
3 ‘…तर त्यातून बाहेर पडणेच योग्य’, घटस्फोटावर मिनिषा लांबाचा खुलासा
Just Now!
X