26 May 2020

News Flash

coronavirus : क्वारंटाइनमध्ये मिलिंद सोमण घेतोय पत्नीकडून खास सेवा

मिलिंद आणि अंकिता नेहमीच चर्चेत असतात

करोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २४ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. सरकारने नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्ती घरात आहे. अशा परिस्थीतीमध्ये सतत चित्रीकरणामध्ये व्यग्र असलेले कलाकार घरात बसून काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकताच मिलिंद सोमणने पत्नी अंकिता सोबतचा एक फोटो शेअर करत तो सध्या काय करत आहे याची माहिती दिली आहे.

मलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिलिंद सोमणची पत्नी अंकिता त्याच्या केसांना तेल लावताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘सहावा दिवस. साधा, सरळ, थोडे उष्ण, नारळाचे तेल माझ्या केसांसाठी’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Day 6. Plain, simple, slightly warmed up, coconut oil for my hair

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजच एक गिटार वाजवतानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यात ती हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टचे ‘लव स्टोरी’ हे गाण गाताना दिसत आहे. मिलिंदने देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो स्विमिंग पुलमध्ये दिसत आहे. तसेच त्याने डम्बल्स आणि वेट उचलून पाण्यात धावण्याचा प्रयत्न केला आहे.

मिलिंद नेहमी त्याच्या फिटनेस आणि पत्नीमुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी अंकिता देखील फिटनेस फ्रिक आहे. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाच्या फरकामुळे त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:36 pm

Web Title: milind soman wife ankita konwar spending quarantine time together avb 95
Next Stories
1 Coronavirus : कनिका कपूरचा तिसरा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह
2 तुला करोना तर झाला नाही ना?; मराठी अभिनेत्रीला येत आहेत फोन
3 “भावा तू तर नजरेनेच एखाद्याला घायाळ करशील”; अनुराग कश्यपने घेतली फिरकी
Just Now!
X