News Flash

मिलिंद सोमणची छोट्या पडद्यावर वापसी, साकारणार ‘ही’ भूमिका

मिलिंदने 'कॅप्टन व्योम' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं होतं

मिलिंद सोमण

गायिका अलिशा चिनॉय यांच्या ‘मेड इन इंडिया’ म्युझिक अल्बममधून कलाविश्वामध्ये पदार्पण करणार मिलिंद सोमण हे नाव आज साऱ्यांनाच ठावूक आहे. मॉडेल ते फिटनेस फ्रिक असा प्रवास करणाऱ्या मिलिंदने ‘कॅप्टन व्योम’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र या मालिकेनंतर तो फार कमी वेळा प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु आता मिलिंद लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद लवकरच ‘जग जननी माँ वैष्णो देवी’ या मालिकेत झळकणार असून या मालिकेत तो भगवान शंकराची भूमिका वठविणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून मिलिंद अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्याकडे वळला आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी प्रथम अभिनेता मोहित रैनाशी शो मेकर्सनी संपर्क करण्यात आला होता. मात्र रोहित अन्य एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने या मालिकेत काम करण्यास नकार दिला. त्यानंतर ही भूमिका मिलिंदच्या वाट्याला आली.

दरम्यान, मिलिंदने २३ एप्रिल २०१८ साली अंकिता कोनवारसोबत लग्न केलं असून अंकिता ही मिलिंदपेक्षा तब्बल २५ वर्षांनी लहान आहे. तेव्हापासून मिलिंद सतत चर्चेत येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 4:42 pm

Web Title: milind soman will play lord shiva role in tv serial jag janani maa vaishno devi ssj 93
Next Stories
1 विसरभोळ्या शबाना आझमी, या पुरस्काराबद्दल आठवेना
2 मुलासाठी अक्षय कुमारची भावनिक पोस्ट
3 किसिंग सीनमुळे सलमानने घेतला ‘ईन्शाल्ला’मधून काढता पाय?