असं म्हणतात कि वय हा फक्त एक आकडा असतो. तरुणाईचा फिटनेस आदर्श अभिनेता मिलिंद सोमणच्या आईने ही गोष्ट वारंवार पटवून दिली आहे. अभिनेता मिलिंद सोमण कायमच मॅरेथॉनमुळे किंवा त्याच्या फिटनेस टीप्समुळे चर्चेत असतो. मात्र आज ‘जागतिक मातृदिना’निमित्त त्याने त्याच्या आईसोबत पुशअप्स करतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. मिलिंद सोमणची आई उषा सोमण या ८० वर्षांच्या आहेत.
It’s never too late.
Usha Soman, my mother.
80 years young.#mothersday #love #mom #momgoals #fitwomen4fitfamilies #fitness #fitnessmotivation #healthylifestyle #fitterin2019 #livetoinspire make every day mother’s day!!!!! pic.twitter.com/7aPS0cWxlR
— Milind Usha Soman (@milindrunning) May 12, 2019
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आज ‘मदर्स डे’निमित्त फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आईसोबतचे फोटो शेअर करत काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मिलिंद सोमणने मात्र आईसोबत पुशअप्स करतांनाच व्हिडीओ पोस्ट करून एक नवीन आदर्श तयार केलाय. ८० वर्षांच्या उषा सोमण यांनी साडी नेसून पुशअप्स केल्या आहेत. “कोणतीही गोष्ट सुरु करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. प्रत्येक दिवस हा मातृदिन असला पाहिजे” असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मनापासून इच्छा असेल तर कोणत्याच गोष्टीची आपल्याला अडचण वाटत नाही हे या व्हिडीओने सिद्ध केलंय.
याआधी सुद्धा मिलिंद सोमणने आईचा मॅरेथॉनमध्ये धावतांनाचा व्हिडीओ शेअर केला होता. ट्विटमध्ये वेगवेगळे हॅशटॅग वापरून ‘सशक्त महिला,सशक्त कुटुंब’ असा संदेश त्याने दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 12, 2019 6:07 pm