बॉलिवूडमधल्या नवोदित चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सॅनॉन. २०१४ साली आलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून तिने अभिनेता टायगर श्रॉफसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या हसण्याने व मनमोकळ्या स्वभावाने ती कायमच प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. ‘बरेली की बर्फी’ ,’लुका छुपी’ अशा चित्रपटांमधून तिने कायमच अभिनयाची छाप पडली आहे. त्यानंतर आता क्रिती पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. क्रिती लवकरच ‘मिमी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

गेल्या काही दिवसापासून क्रितीच्या ‘मिमी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट सरोगसीवर आधारित असून क्रिती यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यामध्ये एका हातामध्ये बाळ झोपलं असून त्याला घेण्यासाठी दुसरा हात पुढे सरसावताना दिसत आहे. हे पोस्टर क्रितीने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. “आयुष्यातला असा प्रवास जो अशक्य अशा चमत्कारीक गोष्टींनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. ‘मिमी’ हा खूप खास असणार आहे”, असं कॅप्शन तिने या पोस्टरला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Mimi @kritisanon

A post shared by K R I T I S A N O N F C (@kritixsanon) on

‘मिमी’ हा चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. एक विदेशी आणि गरीब भारतीय महिलेची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली असून चित्रपटाची मूळ कथा एका बाळाभोवती फिरताना दिसते. त्यामुळे हा चित्रपट आता हिंदीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिमी’चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. दरम्यान, चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत आहे. क्रितीसोबत या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.