गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ८’मधील स्पर्धक अभिनेत्री मिनिषा लांबा ही चर्चेत आहे. लाइमलाइटपासून दूर असलेल्या मिनिषाने तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केल्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. दरम्यान तिने कास्टिंग काउचचा देखील अनुभव सांगितला आहे.

नुकताच मिनिषाने आरजे सिद्धार्थ कन्ननसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी तिने कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे. ‘कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पुरुष असतात तेथे असे घडतच असते. फिल्म इंडस्ट्री याला अपवाद नाही. मला देखील असा अनुभव आला होता. एखादी व्यक्ती तुमच्याशी चित्रपटाविषयी बोलत नाही आणि अचानक रात्री डिनरला येशील का? असे विचाराते’ असे मिनिषा म्हणाली.

आणखी वाचा : ‘त्याने मला फसवले अन्…’, मिनिषा लांबाचा धक्कादायक खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Minissha (@minissha_lamba)

अनेकदा निर्माते ऑफिस बाहेर भेटण्यास सांगत असत असे मिनिषा पुढे म्हणाली होती. बऱ्याच वेळा मिनिषा निर्मात्यांना ऑफिसमध्ये भेटण्यासाठी जात असे. पण निर्मात्यांनी तिला बाहेर भेटण्यास सांगितले होते. मात्र तिने नकार दिल्यामुळे तिला अनेक प्रोजकेट्स गमवावे लागले होते. मिनिषा अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नव्हती.

मिनिषाने २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यहां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बचना ऐ हसीनों’, ‘हनीमून ट्रॅवल्स प्राइवेट लिमिटेड’ आणि ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या काही दिवसांपासून मिनिषा चित्रपटांपासून लांब आहे. ती सध्या ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. ती ‘बिग बॉस ८’मध्ये सहभागी झाली होती.