30 November 2020

News Flash

FTII च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केला निर्णय

FTII च्या अध्यक्षपदी आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातली घोषणा केली आहे. ३ मार्च २०२३ पर्यंत शेखर कपूर यांचा कालावधी असेल असंही जाहीर करण्यात आलं आहे. या आधी डिसेंबर २०१८ मध्ये बी.पी. सिंग यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता मात्र अध्यक्ष म्हणून संवेदनशील दिग्दर्शक शेखर कपूर हे FTII चे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

कोण आहेत शेखर कपूर?
शेखर कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतले अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मासूम हा सिनेमा दिग्दर्शित करत हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्याआधी त्यांनी दिग्दर्शित केलेली खानदान ही मालिका चांगलीच गाजली. मासूम हा सिनेमा केल्यानंतर त्यांनी मिस्टर इंडिया हा सिनेमाही दिग्दर्शित केला. बॅंडिट क्वीन हा फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित सिनेमाही त्यांनी दिग्दर्शित केला आहे. तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी एलिझाबेथ, द फोअर फिदर्स, एलिझाबेथ द गोल्डन एज, न्यूयॉर्क आय लव्ह यू आणि पॅसेज यांसारखे सिनेमा दिग्दर्शित केले आहेत.

शेखर कपूर हे सध्या एलिझाबेथ सीरिजमधला तिसरा पार्ट तयार करत आहेत. एलिझाबेथ द डार्क एज असं या सिनेमाचं नाव आहे. सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर त्यांनी त्यांच्या आगामी पानी सिनेमाबद्दलही त्यांनी लिहिलं होतं. पानी सिनेमात सुशांतची प्रमुख भूमिका होती. हा सिनेमा यशराज तर्फे आणण्यात येणार होता. मात्र शेखर कपूर आणि आदित्य चोप्रा यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे हा सिनेमा शेखर कपूर यांनी सोडला. ज्यानंतर सुशांत निराश झाला होता माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तो खूप रडला होता या आशयाची काही ट्विट्स शेखर कपूर यांनी केली होती. त्यामुळे ते सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 7:42 pm

Web Title: ministry of information and broadcasting today announced shekhar kapur as the new president of ftii society scj 81
Next Stories
1 “नराधमांना जबर शिक्षा द्या”; हाथरस येथील बलात्काराच्या घटनेवर हेमंत ढोमे संतापला
2 ‘बिग बॉस १४’मध्ये होणार राधे माँ यांची एण्ट्री
3 अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अरबाजने केला मानहानीचा दावा
Just Now!
X