News Flash

मीराने केला शाहीदसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा

मीराने तेवढ्याच आत्मविश्वासाने त्याला प्रतिप्रश्न केला की

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हेदेखील 'कॉफी विथ करण'मध्ये गेल्याचे समोर आले आहे.

शाहीद कपूर सध्या भलताच खूश आहे. त्याला कारणही तसेच आहे. कॉफी विथ करणमध्ये ते दोघे गेले असताना मीराने शाहीदची भरभरुन स्तुती केली. शाहीदसोबत लग्न केल्यानंतर ती फारशी प्रसारमाध्यमांच्या समोर आलीच नाही. पण आता ती लग्नानंतर पहिल्यांदाच टीव्हीवर मुलाखतीमधून पदार्पण करत आहे. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये यावेळी मीरानेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

करणने जेव्हा शाहीद आणि मीराला त्यांच्या नात्यापासून ते स्वप्नव्रत वाटेल अशा लग्नापर्यंत विचारले. तेव्हा ते म्हणाले की शाहीदचे बाबा पंकज कपूर आणि आई सुप्रिया पाठक दोघंही मीराला दिल्लीमध्ये जेवणासाठी भेटले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तोपर्यंत ती या दोघांना का भेटते हे माहितही नव्हते. मीराला बॉलिवूडशी संबंधित कोणत्याच गोष्टीत रस नव्हता. शिवाय ती शाहीदलाही काही दिवसांनंतर भेटली. जेव्हा त्यांचे लग्न ठरवण्यात आले तेव्हा ते दोघांसाठीही थोडे अवघड गेले. त्यांनी साधारणपणे ७ तास एकत्र घालवले. या भेटीत एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलत असताना कोणत्या गोष्टी आवडतात, काय आवडत नाही याबद्दल चर्चा केल्या. निघताना त्या दोघांनाही परत एकदा भेटण्याचे ठरवले.

शाहीदने मीराला त्यांच्यातल्या वयात असलेल्या अंतराबद्दल विचारले. तेव्हा मीराने तेवढ्याच आत्मविश्वासाने त्याला प्रतिप्रश्न केला की, ‘तुला तुझ्याहून १३ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न करायला आवडेल का?’

त्यानंतर जवळपास ६ महिने ते एकमेकांना भेटले आणि नंतर साखरपूडा केला. जेव्हा ते दोघे एकमेकांना अधिकाधिक भेटून ओळखण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तो उडता पंजाय या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र होता. त्यानंतर लगेच त्यांनी लग्नही केले. जेव्हा मीराला करणने विचारले की तुझा सगळ्यात आवडता सिनेमा कोणता? तेव्हा मीराने ‘जब वी मेट’ असे उत्तर दिले.

‘मीराने जेव्हा तिचा आवडीचा सिनेमा ‘जब वी मेट’ आहे असे सांगितले, तेव्हा करणने तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. शिवाय ब्रेकमध्ये तिच्या सडेतोड उत्तरांचेही कौतुक केले. तर तिच्या काही उत्तरांवर प्रेक्षकही टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 5:46 pm

Web Title: mira gets candid koffee karan talks about her first meeting hubby shahid
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्रीसाठी हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट?
2 #Dangal VIDEO: तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल.. ‘दंगल’चे दमदार शिर्षकगीत
3 संजूबाबाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X