29 September 2020

News Flash

मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी शाहिद म्हणतो…

शाहिदच्या उत्तरामुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे

शाहिद कपूर, मीरा राजपूत

बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत. २०१५ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणारी ही जोडी अनेक वेळा इन्स्टा, फेसबुक यांच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीचे किंवा मुलांचे फोटो शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे शाहिदपेक्षा मीरा सोशल मीडियावर जास्त सक्रीय आहे. मीरा कलाविश्वामध्ये सक्रीय नसली तरी ती काही जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. त्यामुळे शाहिदप्रमाणेच मीरा कलाविश्वात पदार्पण करणार का असे प्रश्न अनेक वेळा तिला आणि शाहिदला विचारण्यात येतात. मात्र यावेळी शाहिदन मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी एक वक्तव्य केलं. ज्यामुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.

एका मुलाखतीमध्ये शाहिदला मीराच्या बॉलिवूड करिअरविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना ‘हा सर्वस्वी मीराचा निर्णय असेल’, असं शाहिदने सांगितलं. ‘कलाविश्वामध्ये पदार्पण करायचं की नाही हा सर्वस्वी मीराचा निर्णय आहे. आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पहिली मुलगी झाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी मुलगा. त्यामुळे आता अन्य कोणत्या कामांसाठी मीराला वेळ देता येणं तसं कठीणचं आहे’, असं शाहिदने सांगितलं.

दरम्यान, काही दिवसापूर्वी शाहिदचा कबीर सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून त्यानंतर शाहिदने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 11:00 am

Web Title: mira rajput doin films said its completely her decision ssj 93
Next Stories
1 लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियांकाने व्यक्त केली आई होण्याची इच्छा
2 अभिनेता मामूट्टी यांनी सांगितलं मल्याळम सिनेमात सलमानला एण्ट्री न मिळण्याचं कारण
3 टॉलिवूडची सुपरहिट जोडी; अशी आहे नागार्जुनच्या मुलाची लव्हस्टोरी
Just Now!
X