16 December 2017

News Flash

शाहिदचा शाही लूक पाहून मीराने व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा

मीराने शाहिदचा 'महारावल रतन सिंह' होण्यापर्यंतचा प्रवास प्रत्यक्षात पाहिला आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 26, 2017 7:11 PM

शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर

बॉलिवूड वर्तुळात ‘मोस्ट हॅपनिंग’ कपल्सच्या यादीत अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या नावांचा समावेश होतो. चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नसतानाही मीराने ज्या प्रकारे स्वत:ला या सर्व वातावरणात एकरुप करुन घेतलं ही गोष्ट खरंच वाखाणण्याजोगी आहे. हल्ली तर ती शाहिदशिवाय काही कार्यक्रमांनासुद्धा हजेरी लावतेय. आपल्या पतीच्या प्रत्येक भूमिकेविषयीसुद्धा मीरा फार उत्साही असते. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये तिने शाहिदच्या एका चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

शाहिदची मुख्य भूमिकेत असणाऱ्या कोणत्या चित्रपटात तुला भूमिका साकारायला आवडेल, असा प्रश्न विचारला असता मीराने लगेचच ‘पद्मावती’ या चित्रपटाचं नाव घेतलं होतं. मीराने शाहिदचा ‘महारावल रतन सिंह’ होण्यापर्यंतचा प्रवास प्रत्यक्षात पाहिला आहे, त्यामुळेच तिने ही इच्छा व्यक्त केली. याचा प्रत्यय शाहिदचा हा लूक प्रदर्शित झाल्यानंतरच लक्षात आलं.

‘इंडिया डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘पद्मावती’मध्ये दिसणारा शाहिदचा राजेशाही लूक आणि त्याचा एकंदर अंदाज पाहून मीराही फार प्रभावित झाली असल्याची माहिती खुद्द शाहिदनेच दिली. तिच्या या प्रतिक्रियेमुळे एका अर्थी शाहिदला सर्वात सुंदर शब्दांतील प्रतिक्रिया मिळाली असंच म्हणावं लागेल.

#MaharawalRatanSingh #Padmavati

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

वाचा : Padmavati : शाहिदच्या महारावल रतन सिंह लूकसाठी लागले चार महिने आणि २२ कारागीर!

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावर आधारलेल्या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटातील दीपिका आणि शाहिदचा लूक सर्वांसमोर आला असून आता रणवीर सिंग साकारत असलेला अलाउद्दीन खिल्जी कसा दिसणार हे जाणून घेण्यासाठीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First Published on September 26, 2017 7:07 pm

Web Title: mira rajput kapoor feels about hubby actor shahid kapoors padmavati avatar aka maharawal ratan singh