गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. मिर्झापूरचा दुसरा सीझन तर रिलीजच्या अवघ्या एका आठवड्यातच अॅमेझॉन प्राइमवरील सर्वाधिक पाहिली गेलेला सीझन ठरला. आता अॅमेझॉन प्राइमने ‘मिर्झापूर ३’ची घोषणा केली आहे.
चाहते तसेच समीक्षकांकडून ‘मिर्झापूर २’च्या कथानकाचे, अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. प्रेक्षकांनी तर दुसरा सीझन डोक्यावर उचलून धरला होता. ‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २३ ऑक्टोबर रोजी ‘मिर्झापूर २’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन अॅमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहायला मिळाली.
उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले आहे. एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित मिर्झापूरच्या तिसर्या सीझनला हिरवा झेंडा दाखविला आहे हे ऐकताच चाहत्यांना आनंद झाला आहे. आता चाहते मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रचंड उत्सुक आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 6:19 pm