अभिनेत्रींचे बोल्ड सीन्स हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सिनेमांसोबतच वेब सीरिजमध्ये याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. बोल्ड सीन्सवरून अनेकदा अभिनेत्रींना ट्रोलसुद्धा करण्यात आलं आहे. अशा अभिनेत्रींबद्दल सोशल मीडियावर अर्वाच्च शब्दांत टिप्पणी केली जाते. मात्र बोल्ड सीन्ससाठी फक्त अभिनेत्रींनाच का ट्रोल केलं जातं, असा सवाल ‘मिर्झापूर’ वेब सीरिज फेम अभिनेत्री अनंगशा बिस्वासने केला आहे.

“बोल्ड सीनबद्दल अभिनेत्यांना कधीच प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. त्यांच्यावर बोल्ड सीन्समुळे वाईट असल्याचा ठपका बसतो. सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिकाटिप्पणी केली जाते. असं का? समाजाने प्रगतीशील दृष्टीकोन ठेवायला हवा. इंटिमेट सीन शूट करणं हे साहसदृश्य शूट करण्याइतकंच कठीण असतं”, असं ती म्हणाली.

आणखी वाचा : नवाजुद्दीन अन् भावात वादाची ठिणगी; भावाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मिर्झापूर’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्येही अनंगशाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनंगशाने ‘लव्ह शव्ह ते चिकन खुराणा’ या चित्रपटामध्येही भूमिका साकारली आहे.