‘मिर्झापूर’ या बहुप्रतिक्षित वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे या सिरीजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र ‘मिर्झापूर-२’ वर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रसिद्ध कॉमेडिअन, अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी पाठिंबा दिला आहे. “मिर्झापूर सीरिजमधून समाजात अश्लिलतेचा प्रचार केला जातोय” अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

राजू श्रीवास्तव यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मिर्झापूर सीरिजवर भाष्य केलं. ते म्हणाले, “मिर्झापूर २ ही वेब सीरिज अश्लीलतेने आणि हिंसेने भरलेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रेक्षकांच्या मागणीचा विचार करुन या सीरिजवर बंदी घालावी. शिवाय डिजीटल प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होणारा कंटेंट सेन्सॉरद्वारे प्रदर्शित केला जावा.” अशी टीका त्यांनी केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

यापूर्वी काय म्हणाल्या होत्या अनुप्रिया पटेल?

अनुप्रिया पटेल यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली मिर्झापूर विकासाच्या दिशेनं जात आहे. मिर्झापूर समरसतेचं केंद्र आहे. मिर्झापूर नावाच्या वेब सीरिजच्या माध्यमातून हा परिसर हिंसक असल्याचं सांगून बदनाम केलं जात आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून जातीय द्वेष पसरवला जात आहे”