News Flash

‘जानसे मारेंगे तभी जी पायेंगे.. ‘ मिर्झापूर 2 चा आणखी जबरदस्त टिझर

२३ ऑक्टोबरला येणार दुसरा सिझन

अ‍ॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर 2 या वेबसीरिजचा नवा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. जानसे मारेंगे तभी जी पायेंगे असं गुड्डूभय्या या टिझरमध्ये म्हणतोय. मिर्झापूर ही गाजलेली वेबसीरिज आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहे. २३ ऑक्टोबरपासून मिर्झापूर 2 अर्थात या वेबसीरिजचा दुसरा सिझन भेटीला येतो आहे. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे यात काही शंकाच नाही.

पहिल्या सिझनमध्ये गुड्डूला गोळ्या लागल्या आहेत. पण तो वाचला आहे. आता त्याला बदला घ्यायचा आहे. त्याच्या या बदल्याच्या लढाईत त्याच्यासोबत गोलूही असणार आहे. गोलू आणि तिच्या मैत्रिणीनेच गुड्डूला अर्थात अली फजलला वाचवलं आहे. आता नव्या सिझन मध्ये काय काय घडतं ते पाहणं निश्चितच रंजक ठरणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या इन्स्टा पेजवर या सीरिजचा नवा टिझर पाहण्यास मिळतो आहे. त्या टिझरमध्ये गुड्डू आहे जो म्हणतोय की हमारा एकही उद्देश है जानसे मारेंगे, क्योंकी मारेंगे तभी जी पाएंगे..

या आधी आणखी एक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यामध्ये मुन्ना भय्या आणि कालीन भय्या हे नियमांबद्दल बोलत आहेत. ज्यामध्ये कालीन भय्या म्हणतो, “हम पहले भी तुम्हारे मालिक थे और आज भी हैं. गद्दीपर चाहे हम बैठे या मुन्ना नियम तो सेम होंगे…” यानंतर मुन्नाचा आवाज येतो तो म्हणतो, “हम एक और नियम अॅड कर रहें है, गद्दी पर बैठनेवाला कभीभी नियम बदल सकता है” या टिझरलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज गुड्डूचा टिझर भेटीला आला आहे. हे दोन्ही टिझर प्रेक्षकांना आवडले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती सिझन टूची.. तो रंजक असणार यात काही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 10:39 pm

Web Title: mirzapur season 2 teaser ali fazal guddu is blood thirsty scj 81
Next Stories
1 करोना काळात नैराश्येवर मात करण्यासाठी काय कराल? गायक हरिहरन यांनी दिल्या सोप्या टीप्स
2 “कितीही विरोध करा पण तुम्हाला गांधींसमोर डोकं टेकावच लागतं”
3 VIDEO: बिग बॉसच्या घरावरही करोना इम्पॅक्ट; पाहा कसं असणार यंदाचं घर…
Just Now!
X