News Flash

योगायोग म्हणावं की काय? अली फजलच्या घरातही आहेत गुड्डू आणि बबलू

कोण आहेत अलीच्या कुटुंबातील बबलू- गुड्डू ?

अॅमेझॉन प्राइमवरील ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. या सीरिजचा पहिला भाग ज्या पद्धतीने गाजला तितकंच प्रेम ‘मिर्झापूर २’ वरदेखील प्रेक्षक करत असल्याचं दिसून येत आहे. कालीन भैय्या, बबलू, गुड्डू या भूमिकांनी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेष म्हणजे या सीरिजमधील बबलू व गुड्डू या भूमिकांचं आणि अभिनेता अली फजल यांचं एक खास नातं असल्याचं दिसून येत आहे.

‘मिर्झापूर’ या सीरिजमध्ये अभिनेता अली फजल याने गुड्डू पंडीत ही भूमिका साकारली आहे. कालीन भैय्याप्रमाणेच ही भूमिकादेखील सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. खरं पाहायला गेलं तर गुड्डू आणि बबलू या नावांचा अलीशी एक खास संबंध असून सोशल मीडियावर त्याने याविषयी खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या अलीने अलिकडेच त्याच्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तो त्याच्या दोन्ही मामांसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही मामांची टोपणनाव ही बबलू आणि गुड्डू असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

अलीच्या मोठ्या मामाचं टोपणनाव बबलू आहे. तर धाकट्या मामाचं नाव गुड्डू आहे. यो दोघांसोबतचा फोटो अलीने शेअर केला आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मिर्झापूर २ ही सीरिज चांगली गाजत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे कालीन भैय्याप्रमाणेच बबलू आणि गुड्डू या भूमिकांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 11:25 am

Web Title: mirzapur web series guddu and babblu ali fazal family member ssj 93
Next Stories
1 “विकी डोनरमधील आयुषमानचा किसिंग सीन पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”
2 KBC : संघर्षप्रवास! दूध घेण्यासाठीही पैसे नसणाऱ्या रेखा रानीने गाठला ६ लाखांचा टप्पा
3 सूड उगवण्यासाठीच रियाकडून तक्रार; सुशांतच्या बहिणींचा आरोप
Just Now!
X