News Flash

मिशा- मीरा दिसले पण शाहिद कुठेय?

मिशा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे एकटक पाहत होती

मिशा- मीरा दिसले पण शाहिद कुठेय?

शाहिद कपूरची मुलगी मिशा हिचा गोंडस अंदाज पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळाला. मिरा आणि मिशा दोघींना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. यावेळी मिशाने कॅमेऱ्याकडे पाहून चांगल्या पोझही दिल्या. यावेळी मिशा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे एकटक पाहत होती. तैमुरसारखी मिशाही ‘सेलिब्रिटी कीड’ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. शाहिद आणि मीराने कधीही आपल्या चाहत्यांपासून तिला दूर ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत. मिशासारखी मीराही ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राऊझर घातली होती. मीरा आणि मिशाच्या या प्रवासात शाहिद मात्र कुठेच दिसला नाही. कदाचित तो आपल्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमाच्या कामामध्ये व्यग्र असेल.

 

गेल्या काही दिवसांपासून सर्वांत जास्त कोणत्या सिनेमाची चर्चा होत असेल तर तो आहे ‘पद्मावती’. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर्स पाहून चाहत्यांमधील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राणी पद्मावतीच्या भूमिकेतील दीपिका पदुकोण, राजा रावल रतन सिंहच्या लूकमध्ये शाहिद कपूर आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत रणवीर सिंगला पाहून सर्वजण थक्कच झाले.

ऐतिहासिक भूमिका साकारण्याची शाहिदची ही पहिलीच वेळ असल्यामुळे त्याने आपले सर्व कौशल्य या व्यक्तिरेखेसाठी पणाला लावले आहे. शाहिद राजा रावल रतन सिंहच्या भूमिकेला किती न्याय देऊ शकला, हे या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमाच्या प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल. १ डिसेंबर रोजी ‘पद्मावती’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2017 9:16 pm

Web Title: misha and mira are making heads turn at the airport but where is shahid kapoor
Next Stories
1 …म्हणून ‘साहो’च्या सेटवर सुरक्षा वाढवली
2 चाहत्यांना नाही भावला राजा रावल रतन सिंहचा लूक
3 Firangi motion poster: कपिलने ‘फिरंगी’ला मारली लाथ
Just Now!
X