News Flash

‘मिस अर्थ इंडिया’चे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

तिने अमेरिकेत 'मिस अर्थ वर्ल्ड' या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

हेमल इंगळे

भारताच्या मानुषी छिल्लरने नुकताच ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला आणि देशवासीयांची मान अभिमानाने वर केली. सतरा वर्षांपूर्वी ‘मिस वर्ल्ड’ चा मुकुट प्रियांका चोप्राने भारतात आणला होता. त्यानंतर प्रियांकाने अभिनयक्षेत्रात मेहनतीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आणि हॉलिवूडमध्ये यशस्वी होत बॉलिवूडची ती पहिली इंटरनॅशनल स्टार झाली. सौंदर्यस्पर्धा जिंकल्यावर बऱ्याच विजेत्या सुंदरींचा पुढचा स्टॉप असतो तो म्हणजे चित्रपटसृष्टी. आणि त्यात वावगं काहीच नाही कारण चित्रपट आणि सौंदर्य हातात हात घालून चालत असतात. अशीच एक सौंदर्यस्पर्धेची विजेती आपल्या मातृभाषेतील चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकतेय. ‘मिस अर्थ इंडिया’ चा मुकुट संपादन केलेली हेमल इंगळे मराठी चित्रपट ‘आस’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

वाचा : एडनबर्गमध्ये पूजाची ‘लपाछपी’ ठरली लक्षणीय

कोल्हापूरमध्ये वाढलेल्या मराठमोळ्या हेमल इंगळेने पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला. दिल्लीत रंगलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून पाच तर देशभरातून ३५ मुलींनी भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत हेमल भारताची प्रतिनिधी म्हणून अव्वल ठरली होती. त्यानंतर तिने सातासमुद्रापार अमेरिकेत होणाऱ्या ‘मिस अर्थ वर्ल्ड’ या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

वाचा : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर

ही सौंदर्यवती आता आपल्या मातृभाषेतील चित्रपटक्षेत्रात पदार्पण करत आहे. कथा-पटकथा-संवाद लेखक तसेच निर्माते आणि दिग्दर्शक मनोज विशे यांच्या ‘आस’ चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत आहे. ‘पहिल्यांदाच चित्रपटात भूमिका करत असूनही तिने नवखेपणाचा लवलेशही दर्शविला नाही. खरोखरच हेमल ही ‘ब्युटी विथ ब्रेन’ आहे. तिचा अभिनय पाहता ती लवकरच आघाडीची अभिनेत्री होणार यात शंका नाही’ असे चित्रपटाचे निर्माते- दिग्दर्शक मनोज विशे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 2:51 pm

Web Title: miss earth india hemal ingle debut in marathi film industry
Next Stories
1 अनिल कपूरच्या सांताक्रुझमधील कार्यालयावर पालिकेचा हातोडा
2 ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर
3 Video: टायगर श्रॉफच्या चाहत्याने १३ फूट उंचीवरुन मारली उडी आणि…
Just Now!
X