फेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले १० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट २०२०ची विजेता मानसा वाराणसी ठरली आहे. तर हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे. मान्या सिंहने हा किताब तर जिंकलाच आहे पण अनेकांची मने देखील जिंकली आहेत. मान्याचे वडिल रिक्षाचालक आहेत आणि वयाच्या १४व्या वर्षी तिने स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडले होते. सध्या मान्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती वडिलांच्या रिक्षातून एका इव्हेंटला गेल्याचे दिसत आहे. दरम्यान तिचे आई वडिल भावुक झाल्याचे दिसत आहे.
मान्याचे वडिल रिक्षाचालक आहेत. ती त्यांच्या रिक्षामधून एका इवेंटला जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान तिचे आई वडिल भावुक झाल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा: रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया स्पर्धा; मान्या सिंहचा प्रेरणादायी प्रवास
मान्या सिंहचा आणखी एक व्हिडीओ वूंपलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो आतापर्यंत २ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये मान्याचे आई वडिल रिक्षामधून उतरतात आणि मान्या त्यांचा आशिर्वाद घेताना दिसत आहे. दरम्यान तिच्या आई वडिलांना अश्रू अनावर होतात. मान्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
मान्याने काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. यामुलाखतीमध्ये तिने मिस इंडिया पर्यंत पोहोचण्याचा प्रवास किती खडतर होता हे सांगितले होते. ‘मी कमी वयात नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मी जे काही कपडे वापरत होते ते मला इतरांनी दिले होते. मला अभ्यास करण्यासाठी पुस्तके हवी होती. पण ती माझ्या नशीबात नव्हती. माझ्या आई-वडिलांनी त्यांच्याकडे असलेले सगळे दागिने विकले. उत्तर प्रदेशमध्ये एक महिला म्हणून जगणे सोपे नसते’ असे मान्या म्हणाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 11:56 am