अमेरिकेच्या वॉशिंग्टन प्रांताची निवासी असलेल्या मूळ भारतीय वंशाची ‘श्री सैनी’ सध्या मुंबईत आली असून तिचे सर्वत्र जल्लोषात स्वागत होत आहे. न्यूजर्सी च्या फोर्ड्स सिटी मध्ये आयोजित मिस इंडिया व‌र्ल्डवाइड २०१८ चा किताब तिने पटकावला होता. न्यूयॉर्कच्या इंडिया फेस्टिवल कमेटी (आईएफसी) द्वारे आयोजित या स्पर्धेला अनिवासी भारतीय समुदायाची सर्वात जुनी आणि मोठी सौंदर्य स्पर्धा मानले जाते. या सौंदर्य स्पर्धेत १७ देशातल्या भारतीय वंशाच्या सौंदर्यंवतीनी भाग घेतला होता.

विशेष म्हणजे आज २२ वर्षाची असलेल्या ‘श्री सैनी’ला १२ वर्षाची असताना पेसमेकर बसवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले होते कि ती कधीही नृत्य करू शकणार नाही. मात्र यावर मात करत आपली हिंमत न हरता तिने हे यश मिळवले आहे.

श्री सैनी सध्या भारत दौऱ्यावर आली असून मुंबई विमानतळावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. ती मुंबईत १० दिवस राहणार असून यावेळी विविध सामाजिक कार्यक्रमात ती सहभागी होईल. खिताब मिळाल्यानंतर तिचा हा पहिलाच भारत दौरा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे २०१७ मध्ये तिने ‘मिस इंडिया-यूएसए’चा ही खिताब तिने मिळवला आहे.