24 February 2021

News Flash

Viral Video: टॉम क्रुजही झाला भारतनिर्भर… ‘मेड इन इंडिया’ बाईकवर करतोय स्टंटबाजी

‘मिशन इम्पॉसिबल’चा व्हिडीओ व्हायरल...

हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुज आपल्या धमाकेदार अॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट मालिकेत त्याने केलेले स्टंट पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. या मालिकेतील सातवा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात स्टंट करण्यासाठी भारतीय बनावटीच्या BMW G310GS या बाईकचा वापर केला जात आहे. या बाईकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

Kick it up a gear for movie night. Get the Mission: Impossible 6-movie Collection now on Digital and Blu-ray.

A post shared by Mission: Impossible (@missionimpossible) on

BMW ने G310GS ही बाईक काही दिवसांपूर्वीच लॉन्च केली आहे. या सेमी स्पोर्ट्स बाईकची किंमत दिल्लीतील शोरुमध्ये २ लाख ८५ हजार रुपये इतकी आहे. या बाईकचं अपडेटेड वर्जन ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटात स्टंट करण्यासाठी वापरले जात आहे. या बाईकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘मिशन इम्पॉसिबल’ ही एक गुप्तहेर चित्रपटांची सीरिज आहे. या चित्रपटांची कथा इथर हंट या अमेरिकन गुप्तहेराभोवती फिरते. ही व्यक्तिरेखा अभिनेता टॉम क्रुज याने साकारली आहे. खरं पाहाता ही सीरिज अगदी जेम्स बॉण्डसारखीच आहे. परंतु यामध्ये बॉण्ड चित्रपटांपेक्षाही अधिक खतरनाक स्टंट्स पाहायला मिळतात. लक्षवेधी बाब म्हणजे हे सर्व स्टंट चित्रपटातील कलाकार स्वत:च करतात. किंबहुना स्टंट करण्याची तयारी असलेल्या कलाकारांनाच या चित्रपटात झळकण्याची संधी मिळते.

‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजच्या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर झळकले होते. या चित्रपटाचं नाव ‘मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल’ असं होतं. या चित्रपटात अनिल कपूर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रेंचाईजी आता भारतातही खूप लोकप्रिय झाली आहे. दरम्यान टॉम क्रूसने केलेल्या या नव्या स्टंटमुळे प्रेक्षक आता या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:07 pm

Web Title: mission impossible 7 tom cruise made in india bmw bike mppg 94
Next Stories
1 फराज खानच्या मदतीसाठी सलमान आला धावून, भरले हॉस्पिटलचे बिल
2 “बॉलिवूडमधील लांडगे एकत्र आले”; सलमान-आमिरवर कंगना रणौत संतापली
3 पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्हिडीओ शेअर करत मयूरी म्हणाली…
Just Now!
X