07 April 2020

News Flash

‘मिशन मंगल’ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतक्या कोटींची झेप

या चित्रपटाने कमाईमध्ये 'गोल्ड' चित्रपटालाही मागे टाकलं आहे

अक्षय कुमार, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी २९. १६ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘मिशन मंगल’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत २९.१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अक्षयचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानेदेखील पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. परंतु, ‘मिशन मंगल’ने ‘गोल्ड’लादेखील कमाईमध्ये मागे टाकलं आहे. ‘गोल्ड’ने पहिल्या दिवशी २५. २५ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर ‘मिशन मंगल’च्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे.

२४ सप्टेंबर २०१४ मध्ये इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सॅटलाईट लॉन्च केले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. विशेष म्हणजे मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या धाडसी सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलले आणि भारताची मंगळ स्वारी यशस्वी झाली. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम ‘मिशन मंगल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 12:27 pm

Web Title: mission mangal box office collection day 1 film gets bumper opening ssj 93
Next Stories
1 हॉलिवूड आणि बॉलिवूडची तुलना करत ‘सेक्रेड गेम्स २’चा रिव्ह्यू, पाहा मीम्स
2 ‘सेक्रेड गेम्स २’ ला पायरसीचा फटका
3 Video: वडिलांच्या ‘या’ जुन्या गाण्यावर थिरकला रणबीर, नीतू कपूर यांनी शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X