News Flash

लग्नानंतर पहिल्यांदाच मिताली- सिद्धार्थ एकत्र, ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या सीरिजचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ मितालीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे

लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन वाढविणारा चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर अलीकडेच लग्न बंधनात अडकले. मराठी चित्रपटसृष्टीमधील हे सर्वांचे लाडके कपल आहे. पण आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सीरिजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहेत.

‘हौस हसबंड'(Haus Husband) असं नाव असलेली ही ओरिजनल धम्माल ऑडिओ सीरिज ‘स्टोरीटेल मराठी’ने तयार करून नवा पायंडा रचला आहे. रोहित आणि रेवा… आत्ताच लग्न झालेलं, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं एक कपल… एकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या concepts जरा उलट्यापालट्या आहेत… पण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत… सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत… तर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेच ‘स्टोरीटेल मराठी’ची ‘ हौस हसबंड.’

यापूर्वी ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘फिरंग’ सिझन १, २ आणि ‘तो ती आणि तिचा’ सिझन १, २ हिट ठरला होता. त्यानंतर आता ‘हौस हसबंड’ या सीरिजसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. लेखिका गौरी पटवर्धनने या सीरिजचे लेखन केले आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ मितालीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच आता ते आपल्या आवाजाच्या जादूनेही रसिकांना घायाळ करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:17 pm

Web Title: mitali mayekar and sidhar chandekar upcoming project haus husband avb 95
Next Stories
1 राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी सुद्धा…? पोलिसांनी दिलं हे उत्तर
2 मी ते अ‍ॅप बघितलं होतं; मिका सिंगचा राज कुंद्राला पाठिंबा
3 अनुप सोनी क्राइम पेट्रोल नंतर खऱ्या आयुष्यात करणार इन्व्हेस्टिगेशन
Just Now!
X