‘वेब क्वीन’ अशी ओळख असलेली मिथिला पालकर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याासाठी सज्ज झाली आहे. वेब सीरिजमधून लोकप्रिय झाल्यानंतर ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. आता बॉलिवूड चित्रपटात दोन प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत ती भूमिका साकारताना दिसणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता दलकीर सलमान आणि बॉलिवूड अभिनेता इरफान फान या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत मिथिला बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. हुसैन दलाल या चित्रपटाचे कथालेखन करणार असून आकर्ष खुराना याचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालं नसल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात मिथिलाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

वाचा : सरकारी जाहिरातींपासून ते सेन्सॉर बोर्डापर्यंतचा विद्याचा प्रवास

वेब सीरिज, छोटे व्हिडीओज, कप साँग या निमित्ताने मिथिला लोकप्रिय झाली. तिच्या या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे तिचा हटके अंदाज हेच आहे. ‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’, ‘लिटील थिंग्स’ अशा सीरिजमध्ये ती झळकली. पण त्याआधी तिने थेस्पो या मोठय़ा नाटय़महोत्सवात पडद्यामागे काम केलं होतं.