News Flash

“….म्हणून मी माझी स्वप्नं पूर्ण करु शकले”; मिथिला पालकरचा भावूक करणारा व्हिडिओ

मिथिलाचा व्हायरल व्हिडिओ; खट्याळ शैलीतून करतेय भावूक

अभिनेत्री मिथिला पालकर आपल्या लूक्सने आणि अभिनयाने तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. तिचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या गाण्याचे, वादनाचे, वेबसीरीजमधले काही शॉट्स असे अनेक व्हिडिओज कायम चर्चेचा विषय ठरतात. सध्या तिचा एक जुना व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिने आपण कसं स्वतःला शोधलं याबद्दल सांगितलं आहे.

या व्हिडिओमध्ये मिथिला तिच्या घराबद्दल सांगताना दिसत आहे. तिचं दादरमधील घर, तिचं पालनपोषण, तिच्या आजी आजोबांबद्दल ती सांगत आहे. स्टँड अप कॉमेडी शोमधला हा व्हिडिओ असून तो सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ती म्हणते, “माझ्या आजोबांच्या घरात कपाट, कप्पे शोधत बसण्याशिवाय माझ्याकडे दुसरा टाईमपास नसायचा. ते करताना मला एकदा एक मोठा टेप रेकॉर्डर सापडला. मी तो दुरुस्त करायला लावला आणि त्यावर माझी गाणी, भाषणं रेकॉर्ड केली. ती पुन्हा पुन्हा ऐकली. आजोबांच्या खोलीत सापडलेली वाद्यं वाजवली, रेकॉर्ड केली. नाचले. आणि या सगळ्याला माझ्या आजी आजोबांनी प्रोत्साहन दिलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Brut India (@brut.india)

तिने पुढे सांगितलं की, हे सगळं करियर म्हणून करायला तिच्या आजोबांचा विरोध होता. पण बऱ्याच प्रयत्नांनंतर ते तयारही झाले आणि त्यांना तिचं फार कौतुकही होतं. तिने या व्हिडिओच्या शेवटी त्यांचे आभारही मानले आहेत कारण त्यांच्यामुळेच मिथिला इथपर्यंत येऊ शकली, तिची स्वप्नं पूर्ण करू शकली.

हेही पाहाः

या व्हिडिओत मिथिलाने आपल्या आजोबांसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणते, “माझ्या आजोबांशी माझं नातं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना. तिने आपल्यावर असलेल्या बंधनांवरही खट्याळ शैलीत भाष्य केलं आहे. ती म्हणते, मला सातच्या आत घरात यावं लागायचं तेव्हा मला सिंड्रेला असल्यासारखं वाटायचं आणि लपून छपून येणं तर लांबचीच गोष्ट होती. काऱण माझे आजोबा मी येण्याची वाट पाहत बसलेले असायचे.”

तिचा हा खट्याळ, मिश्किल अंदाजातला पण काहीसा भावूक करणारा व्हिडिओ ३१ जानेवारी २०२० रोजी ब्रुट इंडिया या चॅनेलवर प्रदर्शित झाला होता. तो अजूनही व्हायरल होत आहे आणि दररोज हजारोंच्या संख्येने पाहिला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 3:47 pm

Web Title: mithila palkar viral video telling story about her house and grandparents vsk 98
Next Stories
1 अभिजीत, शशांक, मृण्मयी म्हणतायेत “सोपं नसतं काही”!!
2 ‘कोणालाही न सांगता तिने…’, साजिदच्या पत्नीनेच वाजिदला केली होती किडनी दान
3 “डोहाळे पुरवा…सखीचे डोहाळे पुरवा!”, श्रेया घोषालला डोहाळेजेवणाचं ‘हे’ खास सरप्राईझ!
Just Now!
X