बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत डान्स व्हिडीओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मदालसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ये गलियाँ ये चौबारा’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिचा डान्स पाहण्यासारखा आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स व्हिडीओ चर्चेत आहे.

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माचा हा डान्स व्हिडीओ लोकप्रिय टीव्ही शो अनुपमाच्या सेटवरील आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ७८ हजार लोकांनी पाहिला आहे. मदालसाने मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले होते. ती एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तेलुगू इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. ती सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे.

मदालसा ही लोकप्रिय अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते, दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. मदालसाने २०१८मध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले. तिने २००९मध्ये तेलुगू चित्रपट ‘फिटिंग’मध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.