26 October 2020

News Flash

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचे आरोप; पत्नीविरोधातही तक्रार दाखल

मिथुन यांच्या पत्नीने दिली पीडितेला धमकी?

बलात्कार व फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘इंडिया टीव्ही’नुसार, एका पीडितीने महाक्षय व मिथुन यांच्या पत्नीवर बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ पासून पीडित तरुणी आणि महाक्षय एकमेकांना डेट करत होते. याच दरम्यान महाक्षय उर्फ मेमोने २०१५ मध्ये पीडितेला त्याच्या घरी बोलावलं व तिला शितपेयातून नशेच्या गोळ्या दिल्या. तसंच तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने तिला लग्नाचं आमिषदेखील दाखवलं. या काळात त्याने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली. मात्र, त्यानंतर मेमोच्या आईकडून पीडितेला गर्भपात करण्याची धमकी मिळाल्याचं पीडितेने सांगितलं.

पीडित तरुणीने मेमोला गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मेमोने पीडितेला काही गोळ्या खायला दिल्या. ज्यामुळे तिचा गर्भपात झाला, असा आरोपही तिने केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी पीडिता तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, तिची तक्रार नोंदवून घेतली नाही असंही तिने फिर्याद देताना सांगितलं. त्यानंतर मेमो आणि मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी यांनी पीडितेला धमकवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पीडित तरुणी याच दरम्यान दिल्लीला गेली असताना तिने रोहिणी कोर्टात या प्रकरणी न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केली. या प्रकरणी कोर्टाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 11:22 am

Web Title: mithun chakraborty son mahaakshay wife yogeeta bali accused of rape victim fir mumbai ssj 93
Next Stories
1 स्मिता पाटील यांना पडलेलं स्वप्न आणि ‘बिग बीं’चा अपघात..
2 Video : …म्हणून करोनावर मात करणाऱ्या तमन्ना भाटियाची होतीये चर्चा
3 बडोद्याच्या दांडियाची आठवण
Just Now!
X