News Flash

मुलाच्या चित्रपटात कॅमिओ करणार मिथून चक्रवर्ती; बऱ्याच वर्षानंतर ‘बॅड बॉय’ मधून येणार भेटीला

लहान मुलगा नमाशीच्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती एक कॅमिओ सॉंग करणार असल्याचं बोललं जातंय. या गाण्याचं नाव 'जनाब-ए-अली' असं आहे.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बॅड बॉय’ चित्रपटातून भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती डान्स करताना दिसून आले. लहान मुलगा नमाशीच्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती एक कॅमिओ सॉंग करणार असल्याचं बोललं जातंय. या गाण्याचं नाव ‘जनाब-ए-अली’ असं आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन कुरैशी यांनी रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘जनाब-ए-अली’ या जबरदस्त गाण्याचं शूटिंग केलं. या गाण्याला पीयूष भगत आणि शाजिया सामजी यांनी कोरिओग्राफ केलेलं आहे. या कॅमिओच्या निमित्ताने मिथुन चक्रवर्ती बऱ्याच वर्षानंतर कॅमेऱ्यासमोर थिरकरताना दिसून येणार आहेत.

याबद्दल दिग्दर्शक राजकुमार संतोषी म्हणाले, “करोना परिस्थितीमुळे चित्रपटाच्या रिलीज शेड्यूलमध्ये बदल झालेत…या चित्रपटाचं शूटिंग लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी आम्ही आशा करतो…मिथुन दा एक लेजेंड आहेत…या गाण्यात मिथुन दा च्या येण्याने गाण्याला तडका तर मिळणार आहेच पण ‘बॅड बॉय’ चित्रपटात एक जोश देखील पहायला मिळणार आहे.”

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती म्हणाला, “आज मी माझ्या आदर्श व्यक्तीसोबत स्क्रीन शेअर तर केलीच आहे, पण ऑफ स्क्रीन सुद्धा काम केलं. ३५० चित्रपट आणि ३ राष्ट्रीय पुरस्कार घेतल्याचा अनुभव असलेल्या महान अभिनेता मला आणि माझ्या चित्रपटाला आशिर्वाद दिलाय. त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 9:12 pm

Web Title: mithun chakraborty will be seen in his younger son namashi chakraborty film bad boy prp 93
Next Stories
1 राहुल वैद्यला मित्रांनीच दिला दगा; सांगितला लग्नातील मजेशीर प्रसंग
2 …म्हणून करोना नियम तोडावे लागतात; सोनू सूदने व्यक्त केला अनुभव
3 सुनिल शेट्टीने मुलगी अथिया आणि क्रिकेटर केएल राहुलच्या नात्यावर सोडलं मौन; दिले हे संकेत
Just Now!
X