News Flash

सासऱ्यांप्रमाणेच सूनबाईदेखील नृत्यात अव्वल; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘हा’ डान्स

पाहा, मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेचा भन्नाट डान्स

बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचू सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. अलिकडेच मदालसाने इन्स्टाग्रामवर तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान गाजत असून लोकप्रिय ठरत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मदालसाने इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘ओ ना ना’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात ती ग्लॅमरस दिसून येत आहे.


दरम्यान, मदालसाने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमो याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. मदालसा ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ती ‘अनुपमा’ या मालिकेत झळकत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 10:04 am

Web Title: mithun chakrabortys daughter in law madalsa sharmas dance video viral on instagram ssj 93
Next Stories
1 जान्हवी कपूरने जुहूमध्ये घेतलं नवीन घर; किंमत ऐकून व्हाल थक्क!
2 ’खिसा’वर होतोय कौतुकाचा वर्षाव; मराठी कलाविश्वातील दिग्गज म्हणतात…
3 दीपिकाने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सुरु झाली दीप-वीरची लव्हस्टोरी
Just Now!
X