News Flash

मिमोहच्या लग्नातला ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल

जामीन मंजूर झाल्यानंतर मिमोहने मदालसाबरोबर लग्न केलं आहे.

महिलेचा बलात्कार करणं, धमकावणे आणि जबरदस्तीने गर्भपात करणे यासारख्या गुन्ह्यामध्ये फसलेल्या मिमोह चक्रवर्तीचा अटकपूर्व जामीन दिल्लीतील न्यायालयाने मंजूर केल्यामुळे मिमोहने प्रियसी मदालसाबरोबर सप्तपदी घेतली आहे. मिमोहच्या या लग्नाचे काही फोटो, व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.

मिमोह चक्रवर्ती हा बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा असून सध्या तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर एक महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केल्यामुळे मिमोहला अटक होण्याची शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच त्याने दिल्लीतील रोहिणी न्यायालयाकडे दाद मागितल्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर मिमोहने मदालसाबरोबर लग्न केलं आहे.

दरम्यान, मिमोह-मदालसा यांच्या लग्नाचे काही फोटो, व्हिडिओ समोर आले असून यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवविवाहीत दाम्पत्य आनंदी दिसत असून वऱ्हाडीही हा लग्नसोहळा एन्जॉय करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मिमोह वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाही तो हा लग्नसोहळा एन्जॉय करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एकही चिंतेची खूण दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

मिमोहबरोबर लग्नगाठ बांधणारी मदालसा ही अभिनेत्री शिला शर्माची मुलगी असून मदालसाने २००९मध्ये तेलुगू चित्रपट फिटिंगमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 12:23 pm

Web Title: mithun son mahaakshay marriage videos viral
Next Stories
1 मुस्लीम आवडतात का?; वाचा सोनम काय म्हणाली..
2 केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो -संजय दत्त
3 ‘२५ ते ३० कोटी कोणी प्रतिमा बदलण्यासाठी खर्च करत नाही!’
Just Now!
X