01 October 2020

News Flash

‘…हीच त्यांची संस्कृती’, पानसेंना पाठींबा देत खोपकरांचा शिवसेनेला टोला

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष असणाऱ्या खोपकरांनी पानसे-राऊत वादावर व्यक्त केले मत

पानसेंना खोपकरांचा पाठींबा

मुंबईमध्ये २३ जानेवारी रोजी पार पडलेल्या ‘ठाकरे’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी उठून निघून गेले. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अपमान झाल्याने पानसे स्क्रीनिंगमधून तडकाफडकी बाहेर पाडल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये निर्माते आणि खासदार संजय राऊत पानसेंना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या प्रकरणावर आपले मत नोंदवले आहे.

२३ जानेवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा सर्व घटनाक्रम मुंबईतील अॅट्रिया सिनेमागृहामध्ये घडला. याबद्दल ट्विटवरुन खोपकर यांनी आपले मत मांडले आहे. शिवसेना तसेच निर्माते संजय राऊत यांचे नाव न घेता खोपकर यांनी त्यांची संस्कृती असचं वागण्याची असल्याचे मत नोंदवले आहे. आपल्या ट्विटमध्ये खोपकर म्हणतात, ‘अभिजित हे असं वागणं हीच त्यांची संस्कृती आहे पण महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक हे तुझ्या पाठीशी आहेत.’

मागील दोन दिवसांपासून ‘ठाकरे’ या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुभेच्छा देणारे पोस्टर्स मनसेतर्फे दादर- शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. पण या शुभेच्छा देताना शिवसेनेचा तसेच संजय राऊत यांचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळण्यात आला आहे. ‘मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटला मनसे शुभेच्छा’ असं लिहित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष असणाऱ्या खोपकर यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टरमध्ये कुठेही’ ठाकरे’ चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी ‘ठाकरे’ची निर्मिती केली आहे. या पोस्टर्समध्येही मनसेने शुभेच्छा देताना जाणीवपूर्वक शिवसेनेचा उल्लेख टाळला आहे.

दरम्यान काल ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगमधून अभिजित पानसे नक्की कोणत्या कारणाने तडकाफडकी निघून गेले याबद्दल कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 2:18 pm

Web Title: mns chitrapat sena chief amey khopker supports abhijit panse
Next Stories
1 ‘अपमान करण्याला लाथ कशी मारावी तुझ्याकडून शिकावं’
2 ‘लहान मेंदूत कचरा साचला की..’, नाव न घेता संजय राऊतांचा पानसेंवर निशाणा
3 ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचा भाग नसल्याचं दु:ख आजही सलतंय – सोनू
Just Now!
X